प्रसिद्ध कलाकार आणि शिल्पकार राम सुतार यांनी बाबासाहेबांचा पुतळा तयार केला असून तो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून ओळखला जाणार आहे. अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील अकोकिक शहरात 13 एकर जागेवर डॉ.आंबेडकरांचा 19 फुटी पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळ्याच्या उद्घाटनावेळी भारत-अमेरिकेसह जगभरातून आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने येतील, अशी आशा आयोजकांना आहे. समतेचा पुतळा बाबा साहेबांचे संदेश आणि शिकवण जगभर प्रदर्शित करण्यासाठी काम करेल.