अमेरिका: माजी विद्यार्थ्यांचा अंदाधुंद गोळीबार, १७ ठार

अमेरिकेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांने अंदाधुंद केलेल्या  गोळीबारात १७ विद्यार्थी ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.  फ्लोरिडामधील पार्कलँड येथील शाळेत हा प्रकार घडला आहे. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याची ओळख पटली असून निकोलस क्रूझ (१९) असे त्याचे नाव आहे. तो शाळेचा माजी विद्यार्थी असून शाळेतून त्याला काढण्यात आले होते. 
 
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित निकोलसने प्रथम फायर अलार्म वाजवला, त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. सर्वजण जीव वाचवण्यासाठी सैरावरा धावू लागले. त्याचवेळी निकोलसने अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. अनेक मुले जीव वाचवण्यासाठी शाळेतील वर्गांमध्ये लपून बसले. पोलिसांनी हल्लेखोर निकोलसला ताब्यात घेतले आहे.  दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले असून माझ्या संवेदना फ्लोरिडा दुर्घटनेतील पीडितांबरोबर आहेत, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती