पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव ६८ वर्षीय हस्तीमल जैन असे आहे, ते कुर्ला पूर्वेतील नेहरू नगर येथील रहिवासी होते. जैन हे घाटकोपर पश्चिमेकडील आझाद नगरमध्ये गॅस स्टोव्ह विकण्याचे आणि दुरुस्त करण्याचे दुकान चालवायचे. मंगळवारी रात्री दुकान बंद करून घरी परतत असताना गुरुनानक नगरजवळ त्यांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूटरने धडक दिली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.