आंतरराष्ट्रीय दबावामुळे हाफिजला पुन्हा ताब्यात घेतले

26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या मुसक्या पुन्हा एकदा पाकिस्तानं आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हाफिजची नजरकैदेतून पाकिस्तानानं सुटका केली होती. मात्र, भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तानानं नरमाईची भूमिका घेतली आहे. 
 
हाफिजला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेनंही सातत्यानं पाकिस्तानवर दबाव टाकला होता. 
 
हाफिजला नजरकैदेतून मुक्त केल्यानंतर भारतानं याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याचवेळी अमेरिकेनंही पाकिस्तानला स्पष्ट शब्दात खडसावलं होतं. दरम्यान, पाकिस्ताननं हाफिजला पुन्हा ताब्यात जरी घेतलं असलं तरीही त्याच्याविरुद्धचा खटला कमकुवत करुन त्याला कोर्टातून पुन्हा दिलासा मिळू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती