गाझामधल्या संयुक्त राष्ट्रांच्या शाळेवर इस्रायलचा हल्ला, किमान 20जणांचा मृत्यू

गुरूवार, 6 जून 2024 (12:16 IST)
गाझामध्ये शेकडो विस्थापितांना आश्रय दिलेल्या एका शाळेवर इस्रायलने हवाई हल्ला केला आहे.
 
स्थानिक रहिवाश्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 20 हून अधिक लोक ठार झाले आहेत. ही शाळा संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे चालवली जात होती. इस्रायली सैन्याने दावा केला आहे की, या शाळेत हमासचा एक तळ होता.
 
हमासच्या माध्यम विभागाने म्हटलं आहे या हल्ल्यात किमान 27 लोक मारले गेले आहेत आणि इस्रायलने 'भयानक नरसंहार' केल्याचा आरोप हमासने केला आहे. स्थानिक पत्रकारांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने या शाळेतील दोन मजल्यांवर दोन क्षेपणास्त्र डागली.
 
नुसरत निर्वासित छावणीवर इस्रायलने विमानांच्या मदतीने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यातील जखमींना मदत करण्यासाठी रुग्णवाहिका हजर झाल्याची माहिती आहे. तसेच मृतांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती