इस्रायलच्या हवाई दलाचे म्हणणे आहे की, काही वेळापूर्वी रॉकेट प्रक्षेपण झाल्याचे आढळून आले आहे. रॉकेट गाझा पट्टी ओलांडून इस्रायलच्या मध्यभागी समुद्राच्या परिसरात पडले. या रॉकेट हल्ल्याबाबत कोणताही अलार्म सक्रिय झाला नसल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. यानंतर लगेचच आणखी एक रॉकेट प्रक्षेपण झाल्याचे आढळून आले. मात्र, हे रॉकेट इस्रायलपर्यंत पोहोचले नाही. तेल अवीवमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे, मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हमास गाझा युद्धविराम चर्चेवर सातत्याने भर देत आहे. हमासचे म्हणणे आहे की चर्चेपूर्वी इस्रायल आणि मध्यस्थ यांच्यात झालेल्या करारावर चर्चा झाली पाहिजे. यापूर्वी गाझा पट्टीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, इस्रायलने गाझा पट्टीच्या मध्य आणि दक्षिण भागात हवाई हल्ले केले. या हल्ल्यात 19 पॅलेस्टिनी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले होते.