इस्रायलवर हमास या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. हमासच्या हल्ल्याबाबत पाश्चिमात्य देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला असतानाच पश्चिम आशियातील इस्लामिक देश पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एकत्र उभे आहेत. दरम्यान, इस्रायलमधील या वेदनादायक हल्ल्यांमध्ये आतापर्यंत सुमारे 900 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या पलटवारात 690 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. या स्थितीत हमासने गाझा पट्टीवरील हल्ले थांबवले नाही तर इस्रायली ओलीस ठार मारतील, अशी धमकी दिली आहे.