दक्षिण-पश्चिम चीनच्या गुइझोउ प्रांतात शनिवारी एक वेगवान ट्रेन रुळावरून घसरली, त्यामुळे चालकाचा मृत्यू झाला आणि किमान सात प्रवासी जखमी झाले. चीनच्या नैऋत्य गुईयांग प्रांतातून दक्षिणेकडील ग्वांगझू प्रांतात जाणारी बुलेट ट्रेन D2809 त्यावेळी रोंगजियांग स्टेशनवर अचानक भूस्खलनामुळे रुळावरून घसरली.'ग्लोबल टाइम्स' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, युएझाई बोगद्याच्या प्रवेशद्वारावर ट्रेनचे सातवे आणि आठवे डबे रुळावरून घसरले. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला. सर्व जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले असून अन्य 136 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.