लाहोर- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड, लश्कर-ए-तोयबा आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. या वृत्ताला पंजाब प्रांताच्या गृहमंत्रालयाने दुजोरा दिल्याचा दावाही काही माध्यमांनी केला आहे.