सध्या टॅटूही एक लोकप्रिय फॅशन झाली आहे. पण कॅनडातील एका मॉडेलला टॅटू काढणे महागात पडले आहे. कॅट गलिंगर नावाच्या मॉडेलला आपल्या डोळ्याच्या आत टॅटू बनवायचा होता. त्यासाठी कॅट टॅटू काढण्यासाठी गेली. मात्र, हा टॅटू काढल्यामुळे तिला आपल्या डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली आहे.