तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. दरम्यान, राजधानी काबूलच्या विमानतळाबाहेर स्फोट झाल्याचे वृत्त आहे. विमानतळावरील स्फोटाच्या वृत्ताला पेंटागॉनने दुजोरा दिला आहे.या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.या दहशतवादी हल्ल्यात 13अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आहे आणि 18 जखमी झाले आहेत.
जो बायडन म्हणाले की, ज्याने हे केले, त्याला आम्ही क्षमा करणार नाही किंवा विसरणार नाही .काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता अमेरिका,ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने आधीच व्यक्त केली होती.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बॉम्बस्फोटावर निवेदन जारी करून त्याचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- आम्ही काबूलमधील स्फोटांचा निषेध करतो. आम्ही दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करतो. हा स्फोट दाखवतो की आपल्याला दहशतवाद आणि त्याचे पालनपोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.