देवतांची संख्या : 33 कोटी नसून त्यांचे प्रकार 33 असतात, जाणून घ्या ही माहिती

शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (10:45 IST)
देवांची संख्या 33 कोटी नसून त्यांचे प्रकार 33 असतात, या मध्ये आठ वासू, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती समाविष्ट आहेत.
 
कोटी या शब्दाचे दोन अर्थ आहेत कोटी आणि प्रकार, देव हे 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे समजले जातात.
 
देवांच्यासंख्ये विषयी अशी मान्यता आहे की त्यांची संख्या 33 कोटी आहे. पण ही संख्या बरोबर नाही. विद्वान असे म्हणतात की शास्त्रात ते 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देवी-देव म्हटले आहेत. कोटी शब्दांचे दोन अर्थ असल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे.
 
कोटी शब्दाचे एक अर्थ प्रकार असे आहे म्हणजे 33 प्रकारचे देवी देव. कोटी शब्दाचे दुसरे अर्थ कोटी असल्यामुळे 33 कोटी देवी देवांच्या असल्याची मान्यता प्रख्यात झाली असे.
 
या 33 कोटी देवी-देवांमध्ये आठ वासू, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापतीं समाविष्ट आहे . काही शास्त्रांमध्ये इंद्र आणि प्रजापतीच्या जागी दोन अश्विनीकुमारांना 33 कोटी देवांमध्ये समाविष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती