पातोडीची भाजी

साहित्य : चणा डीळीचे १ किलो बेसन, अर्धा पाव खोबरे, १ छटाक लसूण, ५० ग्रॅम जिरे, १ छटाक सांभार, अर्धा कांदा, ५० ग्रॅम गरम मसाला.

कृती : सर्वप्रथम एक छटाक तेल कढईत गरम करुन घ्यावे. त्यानंतर या तेलात मोहरी, जिरे, ओवा, मीठ व मिरची पूड (सर्व प्रमाणानुसार) घालून परतून घ्यावे. हे तेल बेसनामध्ये टाकून पुन्हा परतून घ्यावे. त्यानंतर शिजलेले बेसन एका ताटात थापून घेऊन त्याच्या चोकोनी वड्या करुन घ्याव्यात. खोबरे, लसूण, जिरे आणि कांदा व गरम मसाल्याची मिक्सरमध्ये पेस्ट करावी. ही पेस्ट दोन लीटर पाण्यात घालून त्याची फोडणी घालावी. रस्सा तयार झाला की बेसणाच्या केलेल्या वड्या त्यात घालून अर्धा तास शिजू द्यावे. त्यानंतर पातोडीची भाजी तयार झाली की त्यात वरुन खोबरे किस, सांबार घालून वाढावे. 

वेबदुनिया वर वाचा