नवरा बायकोत विवादाचे कारण बनू शकतो एक्‍वेरियम!

फेंगशुईनुसार सौभाग्यात वाढ होण्यासाठी एक्वेरियम फारच शुभ मानले जाते. एक्वेरियमला घराच्या लॉबी किंवा बैठकीत पूर्व किंवा उत्तर दिशेत स्थापित करणे फेंगशुईनुसार सर्वोत्तम आहे. जाणून घ्या एक्‍वेरियमला घरात ठेवण्याचे नियम.  
 
एक्वेरियमला कधीही शयन कक्षात नाही ठेवायला पाहिजे. यामुळे दांपत्य संबंधांमध्ये तणाव उत्पन्न होऊ लागतो.  
एक्वेरियमला शौचालय किंवा स्वयंपाकघरात ठेवल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.  
 
एक्वेरियमला घरातील बैठकीत अशा प्रकारे ठेवायला पाहिजे जेव्हा गृह स्वामी बैठकीत उभे राहून बाहेर मुख्य दाराकडे बघेल तेव्हा एक्वेरियम मुख्य दाराच्या डाव्याबाजूला असायला पाहिजे. जेव्हा एक्वेरियम प्रवेश दाराच्या उजवीकडे ठेवला असेल तर घरातील पुरुषांमध्ये चरित्रहीनता उत्पन्न होण्याची शक्यता असते.  
 
बैठकीत स्वत:ला बसायचा स्थान या प्रकारे निवडा की एक्वेरियम किंवा इतर कुठलेही जल स्रोत पाठीमागे नसावे अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असते. 
 
सौभाग्य एवं समृद्धीसाठी एक्वेरियममध्ये नऊ गोल्ड फिश ठेवा. या मासोळ्यांमध्ये आठ मासोळ्या लाल रंगाच्या आणि एक मासोळी काळ्या रंगाची असायला पाहिजे.  
 
एक्वेरियम कधीपण प्रमुख प्रवेश दाराच्या दोन्ही बाजूला नाही ठेवायला पाहिजे अन्यथा दुःखदायक परिस्थिती उत्पन्न होते.  

वेबदुनिया वर वाचा