फॅशन रंगे फेंगशुई संगे

मंगळवार, 26 जून 2012 (17:41 IST)
WD
लोकांमधील श्रद्धा अपार असते. जगात कोणती तरी अशी शक्ती आहे जी त्यांचे भवितव्य घडविते अशी त्यांची दाट श्रद्धा असते. अशाच एका चिनी शक्तीचे नाव आहे 'फेंगशुई'. आतापर्यंत याचा वापर फक्त घरात सुख समाधान नांदावे यासाठी केला जाता होता. पण आता फेंगशुईद्वारे लोक आपल्या जीवनात बदल घडवून आणण्याचाही प्रयत्न करीत आहेत.

कपड्यांमध्ये किंवा रंगांमध्येही फेंगशुईचा वापर केला जात आहे. फेंगशुईनुसार कपडे डिझाईन केले जात आहेत. बाजारातही ते उपलब्ध आहेत. फॅशन डिझायनर यांच्या मते फेंगशुईचे महत्त्व पटून ही फॅशन आता पूर्ण जगात पसरेल. फॅशन व्यक्तीच्या मानसिकतेचे द्योतक आहे. आपल्या कपड्यावरून, रंगांवरून आपली बौद्धिक अवस्था कळते. समोरच्या व्यक्तीवरील आपला पहिला प्रभाव केवळ कपड्यांवरूनच पडतो. फेंगशुईच्या कपड्यांनी सकारात्मक परिणाम घडेल.

फेंगशुईच्या मते प्रत्येक व्यक्ती निसर्गाचा आरसा आहे. मनुष्याचे डोळे, केस व त्वचेचा रंग हे पंचतत्वापासून म्हणजे पाणी, लाकूड, अग्नी, पृथ्वी व धातूंच्या रंगांपासून परावर्तित होतात. ह्या प्रत्येक रंगांची आपली एक ऊर्जा असते. याचा अर्थ आमच्यात रंगांचा समन्वय साधला जातो. हे सारे फेंगशुईद्वारे साध्य करता येते. त्याद्वारे भाग्याचे दार उघडते.

पण आपल्यासाठी अनूकल रंग कोणता हे कसे ओळखणार? असा प्रश्न पडला असेल. पण ते फार सोपे आहे. आपले शारीरिक वैशिष्ट्य आपल्याला अनुकूल असा रंग तयार करते. व्यक्तीचे डोळे, त्वचा व केसांचा रंग ज्या प्रकारे असतो त्यात ह्या पाचपैकी एका तत्वांचे प्रतिबिंब पडते. त्यातूनच एक रंग तयार होतो. काहीवेळा एकाच व्यक्तीमध्ये दोन तत्वांचे गुण असतात.

ज्यांच्यात पृथ्वी तत्व आहे....
पृथ्वीला पिवळ्या आणि भुरकट रंगाद्वारे दर्शविले जाते. अशा व्यक्ती परंपरावादी व तटस्थ स्वभावाच्या असतात. पिवळा, नारंगी आणि भुरकट रंग या लोकांसाठी फायदेशीर ठरतात.

ज्यांच्यात अग्नी तत्व आहे....
अग्नीला लाल रंगाद्वारे दर्शविले जाते. या प्रकारचे लोक सर्वांना चकित करणारे व उत्साही असतात. या लोकांसाठी लाल आणि जांभळा रंग उत्तम असतो.

ज्यांच्यात लाकूड तत्व आहे....
लाकडाला हिरव्या व निळ्या रंगांद्वारे दाखविण्यात येते. या व्यक्ती नाजूक, समजुतदार पण वेगळ्या असतात. अशा हलक्या, नर्मविनोदी मूड असणार्‍या लोकांसाठी हलके रंग उपयुक्त असतात. उदा. गुलाबी, पांढरे व आकाशी.

ज्यांच्यात जल तत्व आहे....
पाण्याला काळ्या रंगाद्वारे दर्शविले जाते. या तत्वाचे लोक गूढ प्रवृत्तीचे असतात. काळा व गडद रंग या लोकांना प्रसन्न ठेवणारा असतो.

आपण स्वतःला या तत्वांशी कसे जोडू शकतो? एखाद्या व्यक्तिमध्ये जलतत्व असेल तर त्याचे केस काळे व डोळे हिरवे असतात. जे गुण लाकूड तत्व असणार्‍यांमध्ये असतात तसेच धातू तत्व असणाऱ्यांमध्ये असतात. त्यांची त्वचा फिकट पिवळ्या रंगांची असते.

या रंगांव्यतिरिक्त फेंगशुईमध्ये अध्यात्मिक रंगही असतात. रंगांच्या व्यतिरिक्त कपड्यांच्या माध्यमातूनही आपण आपल्या जीवनात बदल घडवू शकतो. फेंगशुईची ऊर्जा आपल्याला मिळू शकते. उदा. कधीही बटण नसलेला शर्ट घालणे टाळा. चांगले रंग व योग्यरित्या घातलेले शर्ट जैविक ऊर्जा देतात. लाल कॉलरचे पातळ, काळ्या रेषांचे शर्ट उपयुक्त आहेत. जास्त गडद रंगांपासून दूर राहिले पाहिजे. एकाच रंगाचे शर्ट व पॅंट घालणे टाळावे.

फेंगशुईमध्ये रंग जणू जादूचे काम करतात. एखादी लहानशी बाबही फायदेशीर ठरते. महिलांसाठी झालर, समोर खिसे असलेले रंगबिरंगी शर्ट उर्जेच्या मुक्त प्रवाहासाठी फायदेशीर असतात. टोपी घालताना ती पांढर्‍या रंगाची नको हे पहा. टोपीनुसार आपली हेअर स्टाईल करायची असेल तर फेंगशुईचा सल्ला असा आहे, की सरळ केसांपेक्षा कुरळे केस ठेवा. कारण आपली हेअर स्टाईल ऊर्जेला उद्युक्त करते.

धातू फेंगशुईच्या पाच तत्वांपैकी एक आहे. म्हणून दागिने घालतानाही फेंगशुई अनुसरा. कानातल्या मोठ्या कुड्या, हार आणि ब्रेसलेट घालणे उर्जेसाठी फायदेशीर ठरतात.

वेबदुनिया वर वाचा