Dussehra 2022 दसरा कधी आहे ? विजयादशमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (11:55 IST)
Dussehra 2022 दसरा हा सण यावर्षी ऑक्टोबरच्या सुरुवाती येत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार विजयादशमी हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशीच प्रभू रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. याचे विजयाचे प्रतीक म्हणून दरवर्षी रावण दहन केले जाते. त्यासोबतच कुंभकर्ण आणि पुत्र मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन देखील केले जाते. 
 
हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी दसऱ्याची तारीख, वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया.
 
दसरा 2022 तारीख आणि शुभ वेळ
 
विजयादशमी (दसरा) - 5 ऑक्टोबर 2022, बुधवार
दशमी तारीख आरंभ - 4 ऑक्टोबर 2022 दुपारी 2.20 वाजेपासून
दशमीची तारीख समापन - 5 ऑक्टोबर 2022 दुपारी 12 वाजेपर्यंत
 
विजय मुहूर्त - 5 ऑक्टोबर दुपारी 02:07 ते 2:54 पर्यंत
कालावधी- 0 तास 47 मिनिटे
अमृत ​​काल - 5 ऑक्टोबर सकाळी 11.33 ते दुपारी 1:2 पर्यंत
दुर्मुहूर्त - 5 ऑक्टोबर सकाळी 11:51 ते 12:38 पर्यंत.
 
दसरा पूजा विधी
सूर्यास्तच्या वेळी आकाशात काही तारे दिसत असताना त्या कालावधीला विजय मुहूर्त असे म्हणतात. यावेळी कोणतीही पूजा किंवा कार्य केल्याचे चांगले परिणाम येतात. दुष्ट रावणाचा पराभव करण्यासाठी याच मुहूर्तावर प्रभू श्रीरामाने युद्ध सुरू केल्याचे सांगितले जाते. त्याच वेळी शमी नावाच्या झाडाने अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचे रूप धारण केले.
 
दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे म्हणूनच या कालावधीत काहीही नवे सुरू करणे शुभ मानले जाते.
 
या दिवशी क्षत्रिय, योद्धे आणि सैनिक त्यांच्या शस्त्रांची पूजा करतात ज्या पूजेला आयुधा/शस्त्रपूजा असेही म्हणतात. 
 
या दिवशी शमी पूजनही केले जाते.
 
या दिवशी ब्राह्मण देवी सरस्वतीची पूजा करतात.
 
वैश्य या दिवशी त्यांच्या लेखापरीक्षणाची पूजा करतात.
 
अनेक ठिकाणी होणाऱ्या नवरात्रीच्या रामलीलाची समाप्तीही याच दिवशी होते.
 
रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन करून रामाचा विजय साजरा केला जातो.
 
माता भगवती जगदंबेचे अपराजिता स्तोत्र करणे अत्यंत पवित्र मानले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती