दिवाळीत दिवे लावताना या 6 चुका करू नका

दिवाळीत प्रत्येक घर दिव्यांनी उजळून निघतं. दिवाळीला किमान 15 दिवे लावण्याची प्रद्धत आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिवे लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. दिवा लावताना 6 चुका मुळीच करु नये.
 
दिवा लावताना या चुका करू नका-
 
1. तुटलेला दिवा कधीही लावू नका- तुटलेला दिवा लावणे अशुभ मानले जाते. यामुळे पैशाचे नुकसान होते.
 
2. जुने दिवे लावणे देखील अशुभ आहे- मात्र यमदेवासाठी धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा जुना दिवा नक्कीच लावला जातो.
 
3. दिवा लावताना दिशाही लक्षात ठेवा- दिवा पश्चिम दिशेला ठेवल्याने आर्थिक किंवा आरोग्याच्या दृष्टीने नुकसान होतं. दिव्याची ज्योत दक्षिणेकडे ठेवू नये. त्यामुळे कर्ज वाढते.
 
4. जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर पांढरा कापूस वापरा आणि तेलाचा दिवा लावत असाल तर लाल धाग्याचा दिवा लावा. तुपाचा दिवा डावीकडे व तेलाचा दिवा उजवीकडे ठेवावा.
 
5. एक दिव्याने कधीही दुसरा दिवा लावू नये, असे करणे अशुभ मानले जाते.
 
6. दिवा हाताने किंवा फुंकून विझवू नये. पूजेच्या वेळी दिवा विझू नये याची काळजी घेतली पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती