हिंदूधर्मात ब्रम्हा, विष्णू, आणि महेश ह्यांना त्रिदेव म्हटले आहे. ह्या तिन्ही देवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे. दत्तात्रय महाराज ह्या तिन्ही देवांचे मिश्रण आहे. ह्या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु हे महर्षी अत्री आणि देवी अनुसूयाचे पुत्र होते.
दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या प्रदोषकाळात झाला आहे. ह्यांनी २४ गुरूंपासून दीक्षांत घेतले आहे. दत्त संप्रदायाची उत्पत्ती दत्त पासूनच झाली आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्वमनोरथ पूर्ण होतात. असे हे दत्त चिंता व्याधींना दूर करणारे आहे.
दत्त अवताराचे महत्व
एकदा देवी लक्ष्मी, देवी पार्वती आणि देवी सरस्वती ह्यांना स्वतःच्या पतिव्रता असण्याचा गर्व झाला आणि त्यांचामध्ये स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी वाद होऊ लागला. हे कळल्यावर देवश्री नारद त्यांना समजूत काढण्यासाठी गेले पण सर्व प्रयत्न विफळ झाले हे बघून त्यांचा गर्व हरण करण्यासाठी ते त्या तिघींची परीक्षा घेतात. त्या परिणामस्वरूप दत्त अवतार झाले.
दत्त पादुका
अशी आख्यायिका आहे कि दत्त गुरु नियमित रूपाने काशीत गंगेत स्नान करत होते. काशीच्या माणिकर्णिका घाटावर दत्त पादुका आहे. हे स्थळ पूजनीय आहे. दत्त पादुका कर्नाटकातील बेळगाव ह्या ठिकाणी आहे. ह्या पादुकांना दत्त स्वरूपाने स्वीकारून ह्याचे दर्शन घेण्यास भक्तांची बरीच गर्दी असते. येथे गुरुचरित्राचे पारायण आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे अखंड नाम स्मरण नेहमीच चालू असते.