Datta Jayanti Aarti त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।
नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।
 
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।
 
सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त। अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।
परा ही परतली तेथे कैंचा हा हेत । जन्मरमरण्याचा पुरलासे अंत ।।२।। जय देव जय देव
 
दत्त येऊनिया उभा ठाकला । सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।। 
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला । जन्ममरण्याचा फेरा चुकविला ।।३।। जय देव जय देव
 
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। हारपले मन झाले उन्मन ।।
मीतूंपणाची झाली बोळवण । एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।।४।।  जय देव जय देव

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती