आपण कॉविड पॉझिटिव्ह टेस्ट झालात तर!!

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (10:51 IST)
निशा जोहरी, व्यवस्थापकीय संचालक, जोहरी डिजिटल हेल्थकेअर लिमिटेड
आजच्या वातावरणात सर्वात मोठी भीती म्हणजे जर मला कोविड19 झाले तर, कारण महामारी कोणत्याही अंतिम तारखेशिवाय पसरत आहे, मग आपण कामानिमित्त बाहेर जाणे किंवा क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी मित्रांना भेटणे कसे टाळू शकतो. एखादा व्यक्ती केवळ भीतीमुळे घरात राहू शकत नाही!! माझ्या दोन्ही मुली यूएसएमध्ये आहेत, माझे पती, मी जोधपूरमधील “शून्यम” या फार्म हाऊसमध्ये राहतात जे नैसर्गिक वातावरण, सजीव उर्जा, ऑर्गेनिक फार्मिंग, फार्म टू टेबल फूड पार्ट्या यासाठी ओळखले जातात. मी स्वत: ला कामात, बागकामात किंवा नवीन उत्साह सहित स्वयंपाक करण्यात व्यस्त ठेवते.
 
काही दिवसांपूर्वी मला ताप आला आणि चौथ्या दिवशी मी पॉझिटिव्ह टेस्ट झाली!
 
हे लक्षात येण्यास मला काही मिनिटे लागली आणि नंतर, पहिली गोष्ट म्हणजे मी ती पूर्णपणे स्वीकारली. या मान्यतेमुळे, माझ्या शरीरातील प्रत्येक सेल जागृत झाली आणि सकारात्मक उर्जेमुळे मी पूर्णपणे जिवंत असल्यासारखे वाटले, जणूकाही मी अस्तित्वाशी जुडले. मला भीती वाटली नाही, पश्चात्ताप झाला नाही, मला असं करायला हवं होतं असे काही वाटले नाही, ज्याने अन्यथा मला अशक्त बनविले असते आणि माझी ऊर्जा खालावली असती, जर मी जागरूक राहिली नसती. 
 
पूर्ण जागरूकता म्हणून, मी माझ्या आयसोलेशन, होम क्वारंटाईनची प्रक्रिया सुरु केली. माझ्याकडे घरी चांगले सपोर्ट सिस्टम आहे आणि प्रत्येक जण निगेटिव्ह टेस्ट झाला, माझे पती सुद्धा.
 
ताबडतोब मी माझा बेडरूम निवडला आणि जेवण वाढण्यासाठी बाहेर टेबल ठेवले. त्यानंतर माझ्या हालचालीसाठी, बागेत फिरण्यासाठी जागा, एक टांगता बिछाना, योगा, मेडिटेशन आणि पेंटिंगसाठी जागा आणि औषधे, स्टीमर, पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरच्या बाजूला लॅपटॉप निवडला. मी घरी माझ्या कर्मचार्यां ना लिंबू आणि तुळशीसह गरम पाण्याचे थर्मॉस, गुळण्या करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे एक जग, रात्रीच्या वेळेसाठी हर्ब्स, हिबीस्कसची फुले, तुळशी, दालचिनी, जायफळ, लवंगाचा काढा यांची व्यवस्था करण्याची विनंती केली. मी दर 2 तासांनी स्वीट लाईम ज्यूस आणि नारळाच्या पाण्यासहित केवळ लिक्विड डाएट निवडला.
 
मी गुळण्या करणे, स्टीम, सन बाथची विधी सुरू केली. अचानक मला इतके आश्चर्य वाटले की मला फुलांचा वास येत नव्हता! चंचलपणाने जगणे, स्लो वॉक करणे, पेंटिंग करणे, ओशोला ऐकणे आणि मेडिटेट करणे. ही अगदी वेगळी भावना होती, अनंतपणाची भावना, कोणीही तुमची वाट पहात नाही किंवा कोणीही तुम्हाला हाक मारत नाही, कोणीही तुम्हाला भेटायला येत नाही आणि तुम्हाला कोठे जायचे ही नाही!!
 
खरं तर मी चांचलपणाच्या स्पेसमध्ये या नवीन, स्वतःला एन्जॉय केले.
 
सर्वात मनोरंजक शोध म्हणजे ओम मंत्राचा जप करणे, असा आवाज जो माझ्या फुफ्फुसांना आतून कंप आणेल जिथे मला त्रास होत होता आणि मला बरे होण्याचे परिणाम जाणवू लागले. ओशोने एकदा म्हटल्याप्रमाणे आपल्या फुफ्फुसात 6000 छिद्र आहेत, परंतु आपण नियमित श्वास घेताना फक्त 2000 वापरतो आणि 4000 बंद राहतात. डीप ब्रिथिंग फुफ्फुसांना त्याच्या संपूर्ण क्षमतेस उघडून ऑक्सिजन घेण्यास आणि कार्बन-डायऑक्साईड सोडण्यास मदत करते.
 
मी अनुभवले की संपूर्ण आणि नैसर्गिक जीवनशैली, मेडिटेशन, नियमित योग, चालणे, क्रियाकलाप आणि पौष्टिक निरोगी आहार, नियमित जीवनशैलीचा एक भाग म्हणून घरातील पिकविलेले नैसर्गिक भाज्या रोगप्रतिकारक यंत्रणा तयार करण्यास खूप मदत करतात. यामुळे कोणत्याही परिस्थितीत सहजतेने प्रवास करण्यास मदत होते.
 
मी स्वत: ला हाताळू शकले आणि मला आनंद झाला की माझे पती अजूनही कोविडसाठी निगेटिव्ह होते. परंतु नंतर शेवटी श्री. जोहरी यांनाही इतकी सावधगिरी बाळगूनही संसर्ग झाला.
 
माझ्या दृष्टीने, जीवन ही एक कला आहे आणि त्याबद्दल एखाद्याने सर्जनशील असणे आवश्यक आहे. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा आपल्या मानसिक स्थितीवर आणि आरोग्यावर कधीही प्रभाव पडू देऊ नये. अशाप्रकारे आपले आयुष्य अनुभवांनी समृद्ध होऊ शकते, जिथे वृद्धत्व केवळ शहाणपण आणते.
 
वरील परिस्थितीने मला खरोखरच आयुष्याचा अनुभव दिला आहे. या क्षणाबद्दलची जाणीव फक्त अशाच प्रकारे असावी, याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, म्हणून फक्त त्यास स्वीकारून सामोरे जा. मग ही सार्वत्रिक बुद्धिमत्ता आपल्याद्वारे कार्य करते, आपली काळजी घेते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती