केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव यांना कोरोना

शनिवार, 15 ऑगस्ट 2020 (08:31 IST)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच प्रोटोकॉलनुसार आपण गृह अलगीकरणात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार मी गृह अलगीकरणात आहे. माझ्या सोबत कार्यरत असलेले कर्मचारी आणि मित्रांनी स्वत:कडे लक्ष द्यावं. संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जाईल,” अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती