राज्यात १,३३८ नव्याने रुग्णांची नोंद

शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (08:34 IST)
राज्यात शुक्रवारी १,३३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर  एकूण १,५८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
दरम्यान राज्यात झालेल्या ३६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर मृत्यूदर २.१२ टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ४७ हजार ०३८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्के इतके आहे. मात्र राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही १८ हजार ४६५ इतकी आहे. त्याचबरोबर सध्या राज्यात १ लाख ६८ हजार ३३८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती