खुशखबर, आता 5 मिनिटात Corona ची तपासणी

शनिवार, 28 मार्च 2020 (15:49 IST)
अमेरिकेच्या एका प्रयोगशाळेने कोरोना व्हायरसवर एक असे किट काढले आहे ज्याने केवळ 5 मिनिटात व्यक्ती संक्रमित आहे की नाही हे कळू शकेल. विशेष म्हणजे हा किट हलका आणि लहान आहे, किट सहज एकाजागेवरुन दुसर्‍या जागी हालवता येऊ शकते. 
 
एबॉट लेबोरेटरीजने एका वक्तव्यात म्हटले की अमेरिकेच्या खाद्य आणि औषध प्रशासन (एफडीए) द्वारे लवकरात लवकर पुढील आठवड्यात आरोग्य सेवा प्रदात्यांना पुरविण्यासाठी आपत्कालीन मान्यता देण्यात आली आहे.
 
कंपनीने एका वक्तव्यात म्हटले की आण्विक तंत्रावर आधारित या तपासणीत जर व्यक्ती संक्रमित नसेल तर हे देखील 13 मिनिटात माहित पडेल.
 
कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य संचालन अधिकारी रॉबर्ट फोर्ड यांनी म्हटले की 'कोविड-19 जगातिक महामारीवर विविध आघाड्यांवर लढा दिला जाईल आणि मिनिटात परिणाम देणारे पोर्टेबल आण्विक तपासणीद्वारे या व्हायरसला लढा देण्यासाठी आवश्यक रोगनिदानविषयक समाधान सापडेल.'
 
फोर्ड यांनी म्हटले की तपासणी किट सूक्ष्म असल्याने हॉस्पिटलच्या बाहेर लावणे सोपे जाईल जिथे कोविड-19 चे अधिक प्रकरण समोर येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती