संघ लोकसेवा आयोग, UPSC गट 'A' आणि 'B' अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी परीक्षा घेते. यूपीएससी ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी त्यासाठी तयारी करतात.पण, फारच कमी लोक त्यात यश मिळवतात.कारण यूपीएससीचा पेपर सोडवणे इतके सोपे नाही. त्यासाठी वाचन आणि लिखाणाचा सराव करावा लागतो. UPSC परीक्षेत यश मिळण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.चला तर मग जाणून घेऊ या.
यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठीटिप्स-
1. UPSC च्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करा- UPSC ची तयारी करण्यापूर्वी, स्वतःला तयार करा. स्वतःचे मूल्यांकन करा. परीक्षेची तयारी करण्यापूर्वी मानसिक आणि शारीरिकरित्या तयारी करा.