हल्ली घरी बसून ऑडर करुन जेवण मागविण्याचं ट्रेड वाढतच चालले आहे. एका क्लिकवर ऑर्डर आणि काही मिनिटात दारावर आवडते पदार्थ. पण ही ऑर्डर पुरवणार्याची कथा घेऊन आला आहे कॉमेडियन कपिल शर्मा. त्याच्या आगामी 'झ्विगाटो' चित्रपटात दाखवणार आहे की लोकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाइन फूड डिलेव्हरीची सुविधा या व्यवसायातील लोकांसाठी कशा प्रकारे आव्हान बनली आहे.
फूड डिलिव्हरीच्या संख्येवर आधारित अॅपचे रेटिंग आणि ते रेटिंग टिकवून ठेवण्यासाठी शक्य तितक्या ऑर्डर वितरित करण्याची धडपड यांमध्ये एखादी व्यक्ती किती हताश होऊन अडकू शकते हे ट्रेलर दाखवतो. ग्राहकापर्यंत त्याची ऑर्डर पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉयला हवामान, गर्दी आणि रस्त्यावरील जाम अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.