Shah Rukh Khan Accident: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे नाणे पुन्हा एकदा चालू लागले आहे. त्याने 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन केले आहे. त्यांच्या चित्रपटाच्या कमाईपुढे कोणताही हिंदी चित्रपट टिकू शकलेला नाही. 'पठाण'ने जगभरात 1000 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता त्याच्या चाहत्यांच्या नजरा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे लागल्या आहेत. दरम्यान, शाहरुख एका अपघाताचा बळी ठरला आहे.