10 मिनिटांच्या या लघुपटातील सुहानाचा अभिनय, हावभाव, डायलॉग डिलिवरी पाहिलं तर तिने बॉलीवूडसाठी स्वत:ला पूर्णपणे तयार केल्याचं स्पष्ट होत आहे. सुहाना खानच्या पहिल्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे.
लहानपणापासूनच सुहाना खानला तिच्या वडिलांप्रमाणेच अभिनय कारकीर्दीत नाव कमावायचे आहे. याचा खुलासा स्वतः तिचे वडील शाहरुख खान यांनी एका मुलाखतीत केला आहे. सुहाना खानने यावर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. पण तिचा पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी ती आजकाल न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. सुहाना खान देखील तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलमुळे बरीच चर्चेत आहे.