रेस' फ्रँचायझीने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारा सैफ अली खान या चित्रपटाच्या चौथ्या भागात पुनरागमन करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ आणि निर्माता रमेश तौरानी काही काळापासून या चित्रपटासंदर्भात एकमेकांच्या संपर्कात होते. बऱ्याच चर्चेनंतर या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाच्या पुढील भागासाठी दोघांनी होकार दिल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या तिस-या भागाचा प्रेक्षकांवर फारसा प्रभाव पडला नसल्यामुळे, आता ही फ्रेंचायझी रीबूट केली जात आहे, जेणेकरून चाहत्यांना चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी उत्सुकता येईल.
अब्बास-मस्तान दिग्दर्शित, रेस आणि रेस 2 चे , नेत्रदीपक संगीत आणि कथेतील अनपेक्षित ट्विस्टसाठी सर्वत्र कौतुक झाले आहे.मात्र तिसरा भाग प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत नसल्यामुळे आता फ्रँचायझी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सध्या रेस 4 चे स्क्रिप्टिंग सुरु आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा असेल तर, चित्रपटाची टीम पटकथेला उत्तम ट्यूनिंग करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे जेणेकरून ती चाहत्यांच्या अपेक्षांवर खरी उतरू शकेल. रेस 4 ला 'रेस रिबूट' असे नाव दिले जाऊ शकते जेणेकरुन ही मालिका पुन्हा एकदा नवीन शैलीत प्रेक्षकांसमोर सादर करता येईल असे सांगितले जात आहे.