पाहिला का अभिनेत्री नीना गुप्ता यांचा नवा लुक

हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या नीना गुप्ता या त्यांच्या जीवनशैलीसाठीही ओळखल्या जातात. सध्या त्या नव्या लूकसाठी प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांच्या या लूकविषयी सांगावं तर, भल्याभल्यांचं लक्ष वेधणारा असाच हा लूक आहे असं म्हणायला हरकत नाही. Aging fine like wine ही ओळ सार्थ ठरवणाऱ्या नीना गुप्ता यांनी नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 
 
पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये त्या सुरेख आणि साजेशा अशा शॉर्ट हेअर लूकमध्ये दिसत आहेत. 'गुगल वालों अब तो मेरी उम्र कम करके लिख लो', असं कॅप्शन लिहित त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. सोबत एका खास व्यक्तीचे आभारही त्यांनी मानले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती