या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना आढळले की शाहरुख खानला धमकी देणारा फोन कॉल फैजल खानच्या मालकीच्या नंबरवरून आला होता. यानंतर पोलिसांनी फैजलचे लोकेशन शोधून त्याला त्याच्या रायपूर येथील घरातून अटक केली. तपासादरम्यान पोलिसांना समजले की शाहरुख खानला धमकी देणारा फोन फैजल खानच्या फोनवरून आला होता. पण, फैजलने पोलिसांना सांगितले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपला फोन हरवला होता आणि त्याबाबत तक्रारही दाखल केली होती. सध्या मुंबई पोलिसांनी फैजल खानला रायपूर येथून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सर्व बाजूंचा तपास सुरू असून जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.