Maharashtra Live News Today in Marathi हिंदूंना नाही तर भाजपला धोका आहे, असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (09:28 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
पंतप्रधान मोदी आज चिमूर-सोलापूर आणि पुण्यात सभेला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, ते मंगळवार, 13 नोव्हेंबर रोजी चिमूर आणि सोलापूरमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहे. गेल्या आठवडाभरात पंतप्रधान मोदींचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे.
विधानसभा निवडणूक : भाजपविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडे आठ तक्रारी सादर केल्या.
उद्धव ठाकरेंची मशाल घरांमध्ये आग लावत आहे, मुख्यमंत्री शिंदे अस का म्हणाले?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले 'मशाल' आज घरे पेटवण्याचे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
फडणवीस मुस्लिम समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे-ओवेसी
ओवेसींच्या वक्तव्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिउत्तर
काँग्रेसवर निशाणा साधत रामदास आठवलेंनी जातीवादी राजकारणाचा गंभीर आरोप केला
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे लातूर जिल्ह्यातील निलंगा गावात भाषण करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची काँग्रेस सातत्याने फसवणूक करत असल्याचे सांगितले.
आदर्श आचारसहिंता लागू असतांना नवी मुंबईत कोट्यवधींची रोकड जप्त
महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करत आहे, पण तरीही दररोज लाखो कोटींची रोकड जप्त केली जात आहे. सोमवारी ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतून कोट्यवधींची रोकड जप्त केली अशी माहिती समोर आली आहे.
भाजपवर टीका करतांना महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंची जीभ घसरली
नाना पटोले अकोल्यातील एमव्हीएचे उमेदवार साजिद खान यांच्या समर्थनार्थ रॅलीसाठी आले होते. तसेच ते म्हणाले की, भाजपला नेहमीच लोकांना गरीब ठेवायचे आहे.
महाराष्ट्रात "मोठ्या प्रमाणात पैसे वाटप" झाल्याचा संजय राऊत यांचा आरोप
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळच आल्या आहे. निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे तर मत मोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणुकापूर्वी संजय राउत यांनी महायुति आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे शर्यतीतून जवळपास बाहेर
Who is Chief Minister of Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 जिंकण्यासाठी दोन्ही प्रमुख आघाड्या पूर्ण ताकदीने प्रचारात व्यस्त आहेत. महाविकास आघाडीचे (एमव्हीए) प्रमुख नेते राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत,
भाजप आणि त्यांचे सहकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा
Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोमवारी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांचे मित्र पक्ष भ्रष्टाचारात बुडाल्याचा दावा केला आणि त्यांच्यावर विकृत इतिहासाचा प्रसार करत महाराष्ट्रातील महान व्यक्तींचा अपमान केल्याचा आरोप केला.
एकत्र राहिलो तर सुरक्षित राहू चिमूरमध्ये पंतप्रधान मोदी यांची गर्जना
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर पासून असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्व राजकीय पक्ष जाहीर सभा घेत आहे. पंतप्रधान मोदी हे देखील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून जाहीर सभा घेत आहे. आज त्यांनी चिमूर मध्ये सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला.
आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू,मोदींची विरोधकांवर टीका
काँग्रेस आरक्षणामुळे चिडली आहे आणि देशावर राज्य करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, अशी मानसिकता त्यांच्या राजघराण्यामध्ये आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी चिमूर येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले
उद्धव ठाकरेंच्या 2 दिवसांत दोनदा तपासण्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं, निवडणूक आयोग म्हणाला- शहा आणि नड्डा यांचीही चौकशी झाली
महाराष्ट्र निवडणुकांदरम्यान तपासाबाबत राजकीय गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवरून आरोप-प्रत्यारोपांचा फैरी सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरमध्ये तपासण्यात आली.
हिंदूंना नाही तर भाजपला धोका आहे, असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?
Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी भाजप नेत्यांवर निशाणा साधला की, 'बटेंगे तर कटेंगे ' आणि 'एक हैं तो सेफ हैं'