‘केजीएफ चॅप्टर 2'चा टीझर रिलीज

सोमवार, 11 जानेवारी 2021 (11:48 IST)
‘केजीएफ चॅप्टर 2' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. याआधीच ‘केजीएफ चॅप्टर 1' या चित्रपटाने दमदार कामगिरी केली होती. ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजेच अभिनेता यश याच्या वाढदिवसाआधीच ‘केजीएफ चॅप्टर 2' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटासाठीची असणारी उत्सुकता पाहून निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. 
 
‘केजीएफ चॅप्टर 2' टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर काही वेळातच ट्रेंडमध्ये आला आहे. ‘केजीएफ चॅप्टर 2' टीझरच्या सुरुवातीला रॉकीची आई आणि त्याचे बालपण दाखवण्यात आले आहे. ‘केजीएफ चॅप्टर 2'या चित्रपटात अभिनेत्री रविना टंडन एका राजकीय व्यक्तिच्या भूमिकेत झळकली आहे. अद्यापही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. रविना टंडनसोबत या चित्रपटात संजय दत्त, यश, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज यासारखे दिग्गज कलाकार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती