बॉलिवूडची 'क्वीन' आणि मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतसोबत आज चंदीगड विमानतळावर एक अनपेक्षित घटना घडली, ज्यामुळे लोकांना धक्का बसला.आज चंदीगड विमानतळावर एका CISF गार्डने तिला कानाखाली मारली आणि शिवीगाळ केली, ही घटना सुरक्षा तपासणीनंतर बोर्डिंगसाठी जात असताना तिच्यासोबत घडली.एका सीआयएसएफच्या महिला जवानाने तिच्यावर चिडून तिच्या कानशिलात लगावली आणि गैरवर्तन केले.
त्यावेळी, कंगनाने बिल्किस आणि महिंदर कौर या दोघींचे फोटो एकत्र ट्विट करून म्हटलं होतं की, "हा हा. ये वही दादी हैं, जिन्हें टाइम मॅगझीन की 100 सबसे प्रभावशाली व्यक्तियों की लिस्ट में शामिल किया गया था....और ये 100 रुपये में उपलब्ध हैं."
या घटनेनंतर, कुलविंदर कौरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ओरडत आहे आणि म्हणते आहे की, 'तिने (कंगना) सांगितले होते की येथे धरणे बसलेल्या महिलांना प्रत्येकी 100 रुपये मिळाले आहे.माझी आईही त्या निषेधात बसली होती.या प्रकरणानंतर कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आले आहे.