गुरुवारपासून जान्हवीने शूटिंगचे काम सुरू केले. मुंबईतील वांद्रे येथे सेट असून सध्या तिथेच शूटिंग सुरु आहे. यावेळी दिग्दर्शक शशांक खैतान आणि मुख्य अभिनेता इशान खत्तरसुद्धा तेथे उपस्थित होते. येथील शूटिंग संपल्यानंतर टीम कोलकातासाठी रवाना होणार आहे आणि तिथेच उर्वरित शूटिंग करण्यात येईल. जुलैमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ नये यासाठी ती कामावर परतली आहे. सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.