अॅक्शन हिरो टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत

बुधवार, 22 डिसेंबर 2021 (13:02 IST)
बॉलीवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून स्वतःचा एक सेल्फी फोटो शेअर केला आहे, जो पाहून त्याचे चाहते अभिनेत्यासाठी आनंदी होण्या ऐवजी चिंतीत  झाले आहेत. कारण फोटोमध्ये अभिनेत्याच्या डोळ्यांवर सूज आणि काळे डाग दिसत आहेत. टायगरचा फोटो पाहून त्याच्या डोळ्यांना काहीतरी दुखापत झाल्याचं दिसतंय. टायगरचा फोटो पाहून त्याच्याबद्दल विचार करणे आणि काळजी केली जात  आहे कारण  'गणपत'चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान टायगर श्राफ  जखमी झाले आहे, ही  माहिती त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून फोटो शेअर करून दिली. . 
टायगर श्रॉफच्या फोटो कॅप्शनवरून त्याच्या डोळ्याला दुखापत 'गणपत' चित्रपटाच्या शूटिंग सेटवर झाल्याचे दिसते. फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, 'गणपत फायनल काउंटडाउन'. या चित्रात त्याचे डोळे लाल आणि सुजलेले दिसत आहेत. त्याच वेळी, डोळ्यांखाली एक काळे वर्तुळ दिसत आहे, जे गंभीर दुखापत दर्शवत आहे. फोटोमध्ये टायगर  हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जॅकेट घातलेले  दिसत आहे.  टायगरने त्यांच्या पोस्टमध्ये त्यांना दुखापत कशी झाली आणि कधी झाली याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र, त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती