चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (14:50 IST)
पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुनचा त्रास अद्याप कमी होताना दिसत नाही. पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीपासून हा सुपरस्टार वादात सापडला आहे. आता संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेत्याला हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी (24 डिसेंबर) चौकशीसाठी बोलावले आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. 8 वर्षीय बालकाला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले आहे. अशा स्थितीत पोलिसांनी या अभिनेत्याला घटनेच्या संदर्भात मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली.

हैदराबादमध्ये 'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी करत पुरुषांच्या एका गटाने तेलगू अभिनेत्याच्या निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी सुपरस्टारच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. त्यांनी अल्लू अर्जुनविरोधात घोषणाबाजी करत पीडित महिलेच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली.घटनेच्या वेळी अल्लू अर्जुन घरी नव्हता,

दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी सोमवारी चेंगराचेंगरीच्या घटनेत मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. निर्माते नवीन येरनेनी यांनी पीडितेच्या आठ वर्षांच्या मुलावर उपचार सुरू असलेल्या रूग्णालयाला भेट दिली आणि कुटुंबाला धनादेश सुपूर्द केला. या प्रकरणात अलीकडेच अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. अलीकडे अभिनेत्याच्या घरावर दगडफेकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. हे प्रकरण अद्याप निकाली निघाले नव्हते आणि आता पोलिसांनी सुपरस्टारला समन्स बजावले आहे.
 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती