बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याला सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या आहेत. 'शेरशाह'च्या यशानंतर, त्याला पडद्यावर अधिकाधिक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता अभिनेता त्याच्या पुढच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. खरंतर, सिद्धार्थ लवकरच करण जोहरच्या प्रोडक्शनच्या पहिल्या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा करणार असून या चित्रपटात
दोन नायिका असतील,या चित्रपटाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, नायिका जवळपास निश्चित झाली आहे. या प्रकरणावर अंतिम निर्णय न झाल्याने काही दिवसांतच ते सांगितले जाईल.
सूत्रानुसार या चित्रपटात नायिकेचा भूमिकेसाठी जान्हवी कपूर यांचे नाव असू शकते .
दुसऱ्या नायिके बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की दुसरी नायिका म्हणून अनन्या पांडे असू शकते.या चित्रपटांमुळे सिद्धार्थ चर्चेत आहे
सिद्धार्थ शेवटचा 'शेरशाह' चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका केली होती. आता लवकरच तो 'मिशन मजनू' आणि 'थँक गॉड'मध्ये दिसणार आहे. त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.