अभिनेता जॉन अब्राहम आणि अदिती राव हैदरी यांनी आपल्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह हेही मुख्य भूमिका साकारणार आहेत. मात्र, या चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. या फर्स्ट लूकमध्ये अदिती ही कुर्ता व शरारा, तर जॉन अब्राहम हा पगडी घातलेला दिसून येत आहे.