अंकिता लोखंडे म्हणते, तो CHILD Of GOD......

मंगळवार, 14 जुलै 2020 (15:45 IST)
CHILD Of GOD... म्हणतं अखेर अंकिता लोखंडेने एक महिन्यानंतर व्यक्त केल्या आपल्या भावना. अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला एक महिना झाला आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
 
या फोटोत तिने देवासमोर एक दिवा लावला असून CHILD Of GOD असं म्हटलं आहे. तिने तिच्या घरातील देव्हाऱ्यासमोर हा दिवा लावला आहे. सुशांतला आठवत तो परमेश्वराचं बाळ आहे असं म्हटलं आहे.
 
१४ जून रोजी राहत्या घरी सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर अंकिता आपल्या आईसोबत सुशांतच्या कुटुंबियांना भेटायला गेली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती