'पॅडमॅन' चा ट्रेलर रिलीज

शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (15:29 IST)
अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षय कुमारने स्वत: या ट्रेलरचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या सिनेमात अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे मुख्य भूमिका साकारत आहेत.
 

‘पॅडमॅन’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. स्वस्त दरात सॅनिटरी पॅड तयार करणारे कोईंबतूरचे अरुणाचलम मुरुगननाथम यांच्या जीवनाशी प्रेरित या सिनेमाचं कथानक आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या अरुणाचलम् या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन आर. बाल्की करत असून, निर्मितीची जबाबदारी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने घेतली आहे. येत्या 26 जानेवारी 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती