'माँ तुझे सलाम' हा सिनेमा 25 जानेवारी 2002 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सनी देओल, तब्बू , अरबाज खान आणि टिन्नू वर्मा मुख्य भूमिकेत होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'माँ तुझे सलाम 2' या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे. 'माँ तुझे सलाम 2' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिनेविश्लेषक अतुल मोहन यांनी या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"दुध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगो तो लाहौर भी छीन लेंगे". लवकरच थरार, नाट्य आणि अॅक्शनचा तडका असणाऱ्या या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.