देशाचे खरे असलेले हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. त्यामुळे लायकी नसलेल्यांना मूर्खाना उगाच महत्त्व देऊ नका, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी नाव न घेता सलमान खानला टोला हाणला. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर नानांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
‘सगळ्यात आधी देश, त्यानंतर आम्ही कलाकार, कलाकारांची किंमत देशासमोर शून्य असते. ज्यांची लायकी नाही त्यांना महत्व देऊ नका, खरे हिरो आपले जवान आहेत, आम्ही नकली लोक आहोत, आम्हाला इतकं महत्त्व देऊ नका’ अशी विनंतीही नानांनी केली.