दीपिका पादुकोण मानसिक रोगांबद्दल जनजागृती करणार

शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (10:26 IST)
बॉलिवूडपाठोपाठ हॉलिवूडमध्येही  मोहक सौंदर्याने छाप पाडणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण मानसिक रोगांबद्दल जनजागृती करणार आहे. दीपिकाने स्थापन केलेल्या द लिव लव लाफ फाऊंडेशन (टीएलएलएलएफ)च्या द्वारे ती देशातील मानसिक रोगांचे उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावली आहे. 
 
नवी दिल्लीत  मानसिक आरोग्य दिवसाचे औचित्य साधत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत या मोहिमेचे उद्द्याटन करण्यात आले. टीएलएलएलएफची संस्थापिका असलेल्या दीपिका पदुकोनने  वेळी देशात सातत्याने वाढत असलेल्या मानसिक आजारांबद्दल चिंता व्यक्त केली. मानसिक रोगांचा सामना करणार्या  रुग्णांना प्रेम आणि मदतीची आवश्यकता आहे, असे सांगून दीपिका म्हणाली की, दोबारा पुछो या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना मानसिक रुग्णांबद्दल थोडे अधिक संवेदनशील करण्याचा या मोहिमेच्या माध्यमातून लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती निर्माण होईल आणि या व्याधींशी लढण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे आता दीपिका मानसिक रुग्णांना कशी मदत करणार हे पाहावे लागेल.

वेबदुनिया वर वाचा