हे भारतातील 5 सर्वात सुंदर रेल्वे मार्ग आहेत,नक्कीच आपले मन जिंकतील
शनिवार, 3 जुलै 2021 (19:26 IST)
रेल्वेचा प्रवास करणे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं.रेल्वेचा प्रवास आपल्यासाठी खास असतो.आज आम्ही अशेच सर्वात सुंदर रेल्वे मार्गबद्दल सांगत आहोत.यांचे सौंदर्य आपले मन जिंकतील.चला तर मग जाणून घेऊ या.
1 काश्मीर व्हॅली रेल्वे -आपल्याला आपल्या आयुष्यात एकदातरी हा रेल्वेचा प्रवास अनुभव केला पाहिजे.या प्रवासादरम्यान दिसणारे बर्फाच्छादित डोंगर हा संपूर्ण प्रवास खास बनवतात.
2 गोवा वास्कोडिगामा -लोंडा -आपण डोंगरावर राहता किंवा मैदानी भागात राहत असाल इथले डोंगर आणि सपाट दोन्ही प्रकारचे दृश्य बघायला मिळतील.गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या जगातील सर्वात उंच धबधबा दूधसागर मधून ही रेल्वे जाते.
3 नीलगिरी माउंटन रेल्वे- हा क्षेत्र तमिळनाडूमधील मेटटुपालयमपासून ऊटीपर्यंत विस्तारित आहे.1908 मध्ये बनलेली ही रेल्वे निलगिरी पर्वतरांगातील सुमारे 16 बोगदे आणि 250 पुलांवरून जाते.
4 दार्जलिंग टॉय ट्रेन - हा रेल्वे ट्रॅक भारतातील सर्वात प्राचीन पर्वतीय रेल्वे मार्गापैकी एक आहे.हा प्रवास न्यू जलपाईगुडी पासून सुरु होतो आणि आपल्याला चहाचे बागाईत,उंच डोंगर आणि घनदाट जंगलाचे दृश्य दाखवतो.
5 केरळ एर्नाकुलम -कोल्लम -त्रिवेंद्रम -आपल्या नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध रेल्वे मार्ग आपल्याला जीवनातील सर्वात चांगल्या रेल्वेच्या प्रवासाचे अनुभव देतो.ही रेल्वे प्रसिद्ध बॅक वॉटर मधून निघते याचे सौंदर्य आपल्याला पुन्हा केरळच्या प्रवासाला येण्यास भाग पाडतील.