भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहे. प्रत्येक मंदिर विशेष असून देवतांना समर्पित आहे. तसेच भारतात सूर्य मंदिरे देखील आहे. व हे सर्व मंदिरे सूर्य देवाला समर्पित आहे. अशी मान्यता आहे की, शुद्ध मनाने आणि भक्तीभावाने सूर्य देवांची पूजा केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसेच तुम्ही देखील फिरायला जाऊ इच्छित असाल तर भारतातील सूर्याच्या मंदिराला नक्की भेट देऊ शकता. आज पाहणार आहोत  भारतातील प्रसिद्ध सूर्य मंदिरे जे जागृत देखील मानले जातात. 
 
									
				
	 
	महाराष्ट्रातील सूर्य मंदिर-
	महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असलेले सूर्यदेवाचे मंदिर प्राचीन असून खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणून घेतल्यास समजते की, सूर्यदेवाचे हे मंदिर अतिशय सुंदर असून असे मानले जाते की हे मंदिर देवतांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांनी स्वतःच्या हातांनी बांधले होते.   
 
									
				
	 
	कोणार्क सूर्य मंदिर-
	कोणार्क सूर्य मंदिर हे ओडिसा मधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास काही लोकांचा असा विश्वास आहे की ते भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याने बांधले होते. हे भारतातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे अनोखे मंदिर रथाच्या आकारात बनवले असून या मंदिरामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहे. 
 
									
				
	 
	गुजरात मोढेरा सूर्य मंदिर-
	गुजरात मधील प्रसिद्ध सूर्य मंदिर हे मंदिर सोलंकी राजा भीमदेव यांनी बांधले होते. हे मोढेरा गावात पुष्पावती नदीच्या काठावर वसलेले असून हे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे दाखल होतात.