इकॉनॉमिक टाइम्सच्या एका बातमीनुसार, 'भाजपने या निवडणुकीत बऱ्याच चुका केल्या. दलित मतदारांच्या मनात संविधान बदलण्याचा मुद्दा चांगलाच रुजला होता, नरेंद्र मोदींनी अनेकवेळा याबाबत स्पष्टीकरण देऊनही दलित मतदारांना भाजपच्या विरोधात मतदान केल्याचं या बातमीत सांगितलं गेलंय.'
ज्या मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाला त्यामध्ये स्मृती इराणी, अर्जुन मुंडा, महेंद्रनाथ पांडे, आरके सिंग, राजीव चंद्रशेखर, अजय टेनी,कौशल किशोर, निरंजन ज्योती, संजीव बालियान, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भारती पवार, कैलास चौधरी, वी. मुरलीधरन, लोगनाथन मुरुगन, निशित प्रामाणिक आणि सुभाष सरकार यांच्या नावाचा समावेश आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने म्हटलं आहे की, 'भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीत निरुत्साह दिसून आला,कारण मागच्या काही निवडणुकांमध्ये भाजपने सतत विजय मिळवल्या असल्यामुळे कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत कष्ट घेतले नाहीत. अनेक कार्यकर्त्यांना ही निवडणूक सोपी वाटली आणि त्यामुळेच भाजप बहुमताचा आकडा गाठू शकला नाही.'