'एमआय 17' हेलिकॉप्टर चुकून पाडल्याप्रकरणी भारतीय हवाई दलाकडून कारवाई

मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019 (10:31 IST)
'एमआय 17' हे हेलिकॉप्टर पाडल्याप्रकरणी भारतीय हवाई दलानं सहा अधिकाऱ्यांवर कारवाई केलीय. दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शललाही सामोरं जावं लागणार आहे.
 
16 फेब्रुवारीला बालाकोट हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय हवाई दलाच्या काही अधिकाऱ्यांना श्रीनगरजवळील बडगाममध्ये आपलंच एमआय-17 हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यात सहा अधिकारी मृत्यूमुखी पडले होते.
 
भारतीय हवाई दलानं कारवाई केलेल्या सहापैकी दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलला सामोर जावं लागेल, तर उर्वरीत चार जणांना प्रशासकीय कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
 
दरम्यान, एमआय-17 हेलिकॉप्टर चुकून पाडणं ही मोठी आणि गंभीर चूक होती, अशी कबुली काही दिवसांपूर्वीच भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती