काळजी किंवा धास्ती घेणं म्हणजे काय?
एखादी कोणतीही गोष्ट होणं किंवा होण्याची शक्यता घेउन स्वतःला त्रास करून घेणं, किंवा त्यासाठीची भीती बाळगणं. एक घाबरलेला व्यक्ती तणावात राहून सहजच काळजीत पडू शकतो.
धास्ती घेण्याचे किंवा घाबरण्याचे लक्षण काय आहे?
श्वासोच्छ्वास वेगानं होणं, घाम फुटणं, कापरं भरणं, स्नायूंमध्ये ताण येणं, अंधुक दृष्टी होणं, श्वास घ्यायला त्रास होण्यासारखं जाणवणं हे महत्वाचे लक्षणे आहेत.योगाने किंवा व्यायामाने काळजी किंवा भीतीवर उपचार सहज शक्य आहे.