मधुमेह असो वा सर्दी-खोकला, केवळ दररोज 5 मिनिटे हे योगासन करा आणि रोगांना दूर पळवा

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (14:56 IST)
आपल्या जीवनशैलीत आजारांपासून काही खास योगासन वाचवतात. एकूण 84 प्रकाराचे शास्त्रीय योग आसन असतात. योगाचे 8 नियम सांगितले आहे. महर्षी पंतंजली यांनी योगाचे एकूण 196 योगसूत्र सांगितले आहे. 
 
सध्याच्या काळात आपल्या बदलत्या आणि बिघडलेल्या जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे शरीराचे आरोग्य बिघडत आहे. कमी वयातच पाठदुखी, मायग्रेन, थॉयराइड, मधुमेह, उच्च रक्तदाब सारखे आजार वाढतच चालले आहेत. या पैकी काही आजार तर योगासनाने दूर केले जाऊ शकतात. त्यासाठी गरज आहे फक्त आपल्या 5 मिनिटाच्या वेळेची. जर आपण हे योगासन करण्यासाठी फक्त 5 मिनिटे दिले तर आपणास या त्रासापासून आराम मिळू शकतो.
 
* पाठ दुखी आणि त्याची कारणे - 
स्नायूंमध्ये ताण येणं, बसायची आणि उठण्याची पद्धत चुकीची असणं, गरोदरपणी किंवा क्षमतेपेक्षा अधिक श्रम करणं. 

हलासन - जमिनीवर झोपा आणि आपले दोन्ही तळहात जमिनीवर ठेवा. दोन्ही पायाचे टाच आणि पंजे जवळ ठेवा. दोन्ही पायांना हळुवार उचलून 90 अंशाचा कोण बनवत डोक्याच्या मागे घेऊन जावे पाय सरळच ठेवा. हाताला जमिनीवरच ठेवा. गुडघे कपाळावर सरळच ठेवा, दुमडू नये. 1-2 मिनिटे अशा स्थितीत राहून श्वास घ्या आणि सोडा. हळुवार पूर्ववत या. पाय सरळच ठेवायचे आहे हे लक्षात असू द्या. 
या शिवाय त्रिकोणासन, पश्चिमोत्तासन, सुप्तवक्रासन, सेतू बंधासन, भुजंगासन हे आसन देखील फायदेशीर आहे. 

हे करून बघा- मोहरीचे तेल गरम करून या मध्ये 8 ते 10 लसणाच्या कांड्या टाकून शिजवून घ्या. या तेलाला थंड करून पाठीची मॉलिश 10 ते 15 मिनिटे करा. आपणास आराम वाटेल.
 
* मायग्रेन आणि त्याची कारणे - 
पुरेशी झोप न होणं, ताण-तणाव, शरीरात पोषक घटकांचा अभाव, मद्यपान करणं आणि ऍलर्जी होणं.
 
अनुलोम-विलोम प्राणायाम करावं - सुखासनात बसा, कंबर सरळ ठेवा. अनामिक आणि कनिष्ठबोटाने डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. काही काळ थांबा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. थांबा. पुन्हा उजव्या नाकपुडीने हळुवार श्वास घ्या. श्वास हळुवार आत घ्या आणि सोडा. आपल्याला ही प्रक्रिया पुन्हा-पुन्हा 10 मिनिटे करावयाची आहे.
या शिवाय भुजंगासन आणि ब्रह्ममुद्रा हे आसन देखील फायदेशीर आहेत.

हे करून बघावे- अर्धा ग्लास पालक आणि अर्धा ग्लास गाजराचा रस मिसळून प्यावे.
 
* मधुमेह आणि त्याची कारणे -
चुकीची जीवनशैली, खाण्या-पिण्यात चुका होणं, ताण, वंशानुगत, लठ्ठपणा आणि वाढते वय.
 
नौकासन करावं - जमिनीवर सरळ झोपा. डोकं आणि खांदे वर करा. पायांना सरळ उचला. हात पाय आणि डोकं सरळ रेषेत ठेवा. काही काळ अशाच स्थितीमध्ये राहा नंतर पूर्व स्थितीत या. ही प्रक्रिया किमान 3 ते 4 वेळा करावी.
या शिवाय हलासन, बालासन, शवासन देखील फायदेशीर आसन आहेत.
 
हे करून बघा- सकाळी अनोश्यापोटी अर्धाकप कारल्याचे रस प्यावं. नियमानं कोमट दूध घ्या.
 
* सर्दी-पडसे आणि त्याची कारणे -
चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असल्यास, विपरीत हवामानात जास्तकाळ राहणं, व्हायरस, हंगामात बदल होणं.
 
सर्वांगासन करा- पाठीवर झोपा. दोन्ही हातांना जमिनीवर ठेवा. श्वास घेत पायांना वर उचला. पायांना वर घेत हाताने कंबरेला आधार द्या .पायांना 90 अंशाच्या किंवा 120 अंशावर नेऊन कंबरेखाली हात लावा. दोन्ही पाय जवळ चिटकवून सरळ करा. काही काळ तसेच थांबा नंतर पूर्वस्थितीत या.
या शिवाय आपण शवासन, मकरासन आणि धनुरासन देखील करू शकता.
 
हे करून बघा- 1 कप पाण्यात एक चमचा हळद, 3 -4 तुळशीचे पान टाकून 10 मिनिटा पर्यंत उकळवून घ्या. या मध्ये एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती