ऋषी मुनींनी सुरू केली योग साधना,
मनुष्य जातीच्या प्रगतीस मिळाली चालना,
जपू लागला आरोग्य, अन मनस्वास्थ त्यायोगे,
सहचाराने अन विचाराने तो सदा वागे,
कळले मोल त्यास यो गसाधनेचे महान,
अवलंबिले दिनचर्येत योगास ,दिला मान,
झाली निरामय काया त्याची योगासने करून,
पळविले रोगास, नित्य त्याचा अवलंब करून,
परदेशीयांनी सुद्धा त्याचे महत्व नीट जाणले,
विश्व व्यापक होऊनी योग दिसू लागले,
अशी ही साधना मानवाच्या उद्धारा करीता आहे,
आव्हान सर्वास, आबाल वृद्धांच्या हितावह आहे!
..अश्विनी थत्ते